ऑस्ट्रेलियाचे ‘स्लेजिंग’ वॉर

0

रांची । भारत व कांगारू याच्यातील दुसर्‍या सामन्यातील डीआरएस वाद निवळत असतांना कांगारूच्या माजी वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सनने पुन्हा नविन वादाला तोड फोडले आहे. त्याने भारताचा कर्णधार विराट कोहली याला लक्ष्य करतांना खोचक सल्ला दिला आहे की, कोहली सध्याला निराश असल्याचे म्हणत जॉन्ससने त्याला आक्रमता नियंत्रित करण्याचा सल्ला दिला आहे.दोन्ही कसोटीत विराट धावा काढण्यात अपयशी ठरला आहे. 16 मार्च पासून रांची येथे तिसरी कसोटीला प्रारंभ होत आहे.या मालिकेत दोन्ही संघ 1-1 बरोबरीत आहे.कांगारूच्या माजी खेळाडूनी आपली जुनी पुन्हा आमलात आणत तिसर्‍या कसोटीपुर्वी शाब्दीक वार सुरू केले असून या माध्यमातून भारतीय खेळाडूंना दबावात आणण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे.मिशेल जॉन्सनचा कोहलीसोबत आधीसुद्धा वाद रंगला होता.

कांगारू संघ क्रिकेट जगामध्ये सेजिक करून प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्माण करण्याचे तंत्र अलंबितात हे तंत्र त्याचे जुने आहे.त्याचाच प्रारंभ ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सनने सुरवात केली आहे. त्याने सरळ भारतीय संघाच्या कर्णधार विराट वार करित म्हणाला की, कोहली निराश आहे.तो धावा काढण्यात अपयशी ठरत आहे. यामुळे त्याच्यावरील दबाव आणि त्याची निराशा वाढली आहे. भारतीय कर्णधाराने आपली नाहक आक्रमकता नियंत्रित करण्याची गरज आहे.याबद्दल त्याने आपल्या कॉलममध्ये लिहले आहे की, कोहली खूप आक्रमक आहे. मात्र, धावा निघत नसल्यामुळे तो या मालिकेत निराश आहे. तो आपल्या भावनांना व्यक्त करून आनंद व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय संघाने दुसर्‍या सामन्यावर पकड मिळवली. त्यानंतर कोहलीची भावना बदललेली दिसली. निराशेमुळेच कोहली विविध वादांत पडत आहे,’ असेही त्याने म्हटले.

जॉन्सन आणि कोहली एकमेकांसमोर आले तेव्हा बरेचदा वाद रंगला आहे. 2014 मध्ये मेलबर्न येथे बॉक्सिंग डे कसोटीच्या वेळी कोहलीने जॉन्सनच्या एका चेंडूवर जोरदार डिफेन्स केला होता, तेव्हा जॉन्सनने रागाच्या भरात चेेंडू उचलून स्टम्पकडे फेकला. त्याने तो चेंडू कोहलीच्या पाठीवर थ्रो केला. त्या सामन्यात कोहलीने 169 धावा ठोकल्या. सामना संपल्यानंतर कोहलीने जॉन्सनवर विरोधी खेळाडूचा सन्मान करत नसल्याचा आरोप केला होता.

संघ रांचीत दाखल
दोन्ही संघाचे खेळाडू आज रांचीत पोहोचणार, तिसरी कसोटी 16 ते 20 मार्चदरम्यान रांचीत जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणार्‍या मालिकेतील तिसर्‍या क्रिकेट कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाचे संघ रांचीत ंपोहोचला. 16 ते 20 मार्चदरम्यान रांची शहर क्रिकेटच्या रंगात रंगेल. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ सध्या 1-1 ने बरोबरीत आहेत. ऑस्ट्रेलिया संघ आणि भारतीय संघातील सपोर्ट स्टाफ 13 मार्च रोजी रांचीत पोहचले तर टीम इंडियाचे खेळाडू वेगवेगळ्या विमानाने पोहोचतील. भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ 14 आणि 15 मार्च रोजी जेएससीए स्टेडियमवर सराव करतील. विराट कोहली जेएससीए स्टेडियमवर दुसर्‍यांदा कर्णधारपद भूषवण्यासाठी उतरेल.

मालिकेतील टॉप गोलंदाज
आर. अश्विन 15 विकेट
स्टीव्ह ओकिफे15 विकेट
नॅथन लॉयन13 विकेट
रवींद्र जडेजा12 विकेट.

मालिकेत आतापर्यंत
01 शतक
09 अर्धशतके
154 चौकार
14 षटकार

मालिकेतील टॉप फलंदाज
लोकेश राहुल 215 धावा, 3 अर्धशतके
स्टीव्ह स्मिथ 172 धावा, 1 शतक
रेनशॉ 164 धावा, 2 अर्धशतके
चेतेश्वर पुजारा 146 धावा, 1 अर्धशतक
अजिंक्य रहाणे 100 धावा, 1 अर्धशतक