ऑस्ट्रेलियाचा सफाया करू

0

चेन्नई । इंग्लंड संघाचा दारूण पराभव केल्यानंतर भारताचे लक्ष हे ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावरून लागले आहे.अनेक दिग्गंज स्टीव्हनला सल्ले देत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका ही टीम इंडियासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. यश मिळवण्यासाठी दमदार आणि मोठी सलामी संघासाठी आवश्यक असते. अशातच भारताचा सलामी फलंदाज मुरली विजयने मात्र आगामी मालिकेत भारतीय संघ ऑस्ट्रेलियाचा सफाया करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल, असा ठाम विश्‍वास व्यक्त केला आहे. भारतीय संघाला भक्कम सलामी देण्याचा मी प्रयत्न करेन. असा विश्‍वास व्यक्त केला. ऑस्ट्रेलियन संघ एक अत्यंत चांगला संघ आहे. असे असले तरी गेल्या तीन वर्षांत भारतीय संघ जबरदस्त कामगिरी करत आहे. सध्या आमच्या संघातील सर्व फलंदाज जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. यामुळे आम्ही चार कसोटी सामन्यांची मालिका 4-0 अशी एकतर्फी जिंकण्याच्या निर्धाराने मैदानात उतरू.

मुरली विजयची सुधारणा
ऑस्ट्रेलियाविरुद्ध या महिन्याच्या अखेरपासून सुरू होणार्‍या कसोटी मालिकेत टीम इंडियाचेच वर्चस्व राहील असे सांगून मुरली विजय पुढे म्हणाला, मी सध्या माझ्या खेळात सुधारणा करत आहे. खासकरून ऑस्ट्रेलियाचा प्रमुख आणि वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कविरुद्ध खेळण्यासाठी मी स्वत:ला तयार करत आहे.मागील काही सामन्यात भारताची सलामी जोडी दुखापतीनी ग्रस्त झालेली दिसून येत आहे. त्यामुळे सलामी जोडी घेवून अनेक पर्याय किंवा बदलाव करण्यात आले. यावर मुरली विजय म्हणाला की, दुखापती टाळू शकत नाही.

पाहिली कसोटी 23 रोजी पुण्यात होणार
मात्र खेळाडूने आपल्या फिटनेसवर लक्ष दिले पाहिजे. कारण एवढे त्यांच्या हातात आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीबद्दल बोलताना मुरली विजय म्हणाला, ज्यावेळी गेम प्लॅनचा विजय येतो, त्यावेळी मी विराटच्या नजरेतूनच पाहण्याचा प्रयत्न करत असतो. विराट अत्यंत चांगला क्रिकेटर आहे. तो आपल्या शानदार प्रदर्शनाने नवे मापदंड स्थापन करत आहे. त्याने गेल्या वर्षभरात क्रिकेटच्या तिन्ही प्रारूपात 2595 धावांचा पाऊस पाडला आहे. यामुळेच तो 2016 मध्ये कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा काढणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. भारत विरूध्द आस्ट्रेलिया याच्यातील चार कसोटी सामन्यातील पहिली कसोटी हे 23 फेब्रुवारी रोजी पुण्यात होणार आहे.