ऑफ स्पिनर नॅथनचे उजव्या हाताचे बोट झिजले !

0

रांची । भारत विरूध्द कांगारू याच्या कसोटी मालिका सुरू आहे. या दोन्ही संघात दोन कसोटी सामने झाले आहे. या दोन्ही सामन्यात ऑफ स्पिनर नॅथन लायनने चेंडू फिरवून फिरवून उजव्या हाताची बोटे घासरली गेली आहे.भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधल्या तिसर्‍या कसोटीला 16 मार्चपासून रांचीत सुरुवात होत आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये चेंडू फिरवून फिरवून, कांगारू संघाचा ऑफ स्पिनर नॅथन लायनच्या उजव्या हाताच्या दुसर्‍या बोटाची त्वचा सोलली गेली आहे. पण त्यानंतरही आपण रांचीच्या तिसर्‍या कसोटीत खेळू शकू, असा विश्वास लायनला वाटत आहे. ऑफ स्पिन वर्षानुवर्षे टाकत असलेल्या गोलंदाजांच्या उजव्या हाताच्या दुसर्‍या बोटाची त्वचा जाड झालेली असते. त्यामुळे तिथे इजा होण्याची शक्यता कमी असते. पण बंगळुरू कसोटीच्या दुसर्‍या डावात गोलंदाजी करताना लायनच्या उजव्या हाताच्या दुसर्‍या बोटाची त्वचा सोलून निघाली आहे.