ऑनलाईन शिक्षण यशस्वी करण्यासाठी पालकांनी प्रौढ होण्याची गरज

0

चिन्मय जगताप: 

मुले मोबाइलच्या आहारी जातील ही एक बाजू असली, तरी हीच मुले जेव्हा शाळेत किंवा कॉलेजात जातात तेव्हा अभ्यास करतात. लॉकडाऊनच्या काळात घरात बसून मुले ऑनलाइन शिक्षण घेत आहेत, मात्र ही शिक्षणाची पद्धत होऊ शकत नाही म्हणून ती गांभीर्यीने न घेण योग्य नाही. ऑनलाईन वर्ग सुरू असताना मुलांना घरकाम सांगणे किंवा आपल्या व्यवसायात मदत करायला लावणे ही अत्यंत चुकीची बाब आहे. आजचे दिवस आणि येणारा काळ हा तंत्रज्ञानाचा आहे. ऑनलाईन शिक्षण हे शिक्षणाचे भविष्य आहे.जो काळाबरोबर बदलत नाही तो मागे फेकला जातो हा इतिहास आहे.

कोरोना आजारावर लवकरात-लवकर लस तयार होईल आणि हा आजार जगातून हद्दपार होईल अशी सर्वचजण अपेक्षा करत आहेत. याच बरोबर या आजाराचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने आणि राज्य शासनाने कमी-अधिक प्रमाणावर वेगवेगळे निर्बंध लावले आहेत. ज्यात सर्वात महत्वाचे म्हणजे शाळा आणि कॉलेज बंद आहेत. यामुळे सर्वत्र एक नवीन शैक्षणिक पद्धत सुरु झाली ती म्हणजे ऑनलाइन शिक्षणाची. यानुसार अनेक शिक्षक टीव्ही चॅनल्सवर, यूट्युबवर, ब्लॉगवर ऑनलाईन माध्यमातून किंवा मोबाईलवर डिजिटल शिक्षण देत शाळा बंद असताना विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहेत.

वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांनी शिक्षकांसाठी फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम्स सुरु केले आहेत. ज्यामध्ये ऑनलाइन शिक्षण कसे देता येईल, त्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांची कोणती साधने, कोणकोणते अ‍ॅप्लिकेशन्स आहेत याविषयीची माहिती दिली जाते. अद्ययावत व्हायचा प्रयत्न शिक्षक करताहेत, मध्यमवर्गीय पालक याला अद्ययावत न समजता एक पर्याय इतकच पाहत आहेत.

ऑनलाईन शिक्षणासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांकडे किमान स्मार्टफोन असणे अभिप्रेत आहे. स्मार्टफोन्स असले तरी उत्तम इंटरनेटची कनेक्टिव्हिटीची जोडणी तेवढीच महत्त्वाची आहे. हे सर्व शहरी भागात व ज्यांची आर्थिक परिस्थिती भक्कम आहे त्यांच्याकडे सहज उपलब्ध झाले आहे. ऑनलाईन व डिजिटल शिक्षणाच्या हट्टापोटी मुलांनी पालकांकडे स्मार्टफोन खरेदी करण्याचा हट्ट धरला आहे. माझ्या परिचयातील विद्यार्थ्यांशी आणि त्यांच्या पालकांशी मी जेव्हा बोलायचा प्रयत्न केला तेव्हा माझ्यासमोर एक आश्चर्यचकित करणारे वास्तव उभे राहिले आहे. ते म्हणजे ऑनलाईन शिक्षणाबद्दल माहिती असूनही बहुतांश विद्यार्थ्यांनी एकही ऑनलाईन वर्ग १०० टक्के लक्ष देऊन पूर्ण केलेला नाही. कारण, पालकांना नवीन तंत्रज्ञानाची भीती वाटते. काहींना संभ्रम आहे की आपल्या मुलांना ही पद्धत झेपेल की नाही. बहुतांश पालक या ऑनलाईन शिक्षणाच्या भविष्याबद्दल फार उदासीन आहेत. मी जेव्हा पालकांशी बोलायचा प्रयत्न केला तेव्हा केवळ चार-पाच पालकांनीच या शिक्षणाला चांगले माध्यम म्हटले. मात्र, बहुसंख्य पालक या शिक्षणाकडे फक्त शाळा, कॉलेज सुरू होईपर्यंतची तात्पुरती सोय असल्यासारखे पाहत आहेत. मुले शाळेत गेली, कॉलेजात गेली म्हणजे तिथे प्रत्यक्ष शिक्षक असतात त्यांना प्रत्येक मुलाचा स्वभाव माहित असतो. आपला विद्यार्थी किती आभास करू शकतो किंवा किती अभ्यास करू शकत नाही याबद्दलची माहिती असल्यामुळे विद्यार्थीवर्गाला चांगले मार्गदर्शन करू शकतात.

या उलट ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षक प्रत्येक मुलावर वैयक्तिक लक्ष देऊ शकत नाहीत. या शिक्षण पद्धतीत लहान मुलांना डोळ्याचे, कानाचे विकार होण्याची भीती सर्वांनाच आहे. याच बरोबर ही मुले टेक्नॉलॉजी फ्रीक होतील किंवा त्यांना मोबाईल वा कॉम्प्युटरचे व्यसन लागेल अशी भीतीही पालकांना वाटत आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धतीसाठी पालकांनीदेखील शिक्षित होणे आवश्यक झाले आहे. लेक्चर सुरु असताना आपल्या मुलांना काम सांगायचे की, जा दूध घेऊन ये किंवा त्याला घरकामात मदत करायला लावायची. हे प्रकार थांबायला हवेत.

मुले मोबाइलच्या आहारी जातील ही एक बाजू असली, तरी हीच मुले जेव्हा शाळेत किंवा कॉलेजात जातात तेव्हा अभ्यास करतात. लॉकडाऊनच्या काळात घरात बसून मुले ऑनलाइन शिक्षण घेत आहेत, मात्र ही शिक्षणाची पद्धत होऊ शकत नाही म्हणून ती गांभीर्यीने न घेण योग्य नाही. ऑनलाईन वर्ग सुरू असताना मुलांना घरकाम सांगणे किंवा आपल्या व्यवसायात मदत करायला लावणे ही अत्यंत चुकीची बाब आहे. आजचे दिवस आणि येणारा काळ हा तंत्रज्ञानाचा आहे. ऑनलाईन शिक्षण हे शिक्षणाचे भविष्य आहे.जो काळाबरोबर बदलत नाही तो मागे फेकला जातो हा इतिहास आहे. म्हणून पालकांनी प्रौढ होऊन ऑनलाईन शिक्षणाचे स्वागत केले पाहिजे.

ऑनलाइन शिक्षणातील व्यत्यय असेही
मुलांच्या ऑनलाईन शिक्षणात व्यत्यय येण्याचे अनेक गंमतीशीर प्रकार पालकांकडून घडत असतात. शिक्षकांशी आणि पालकांशी बोलताना हे प्रकार समोर आले आहेत.

१) मुलांऐवजी स्वतः तासाला बसणे : जळगावात एका इंग्रजी शाळेच्या इयत्ता तिसरीतील विद्यार्थ्याला ऑनलाइन शिकवणार्‍या शिक्षिका म्हणाल्या की, आम्ही झूम अ‍ॅप्लिकेशनच्या सहायाने विद्यार्थ्यांना शिकवत असतोे. एकावेळी ६० मुलांच्या विंडो ओपन असतात. एके दिवशी माझ्या लक्षात आले की, एका विंडोमध्ये विद्यार्थी बसला नसून, त्याचे पालक त्या तासाला बसले होते. तो तास संपल्यावर मी त्या पालकांशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी मला समजावयाचा प्रयत्न केला की, या ऑनलाईन शिक्षणामुळे आमच्या मुलाला डोळ्याचे विकार होऊ शाकतात. त्यामुळे आम्ही ठरवले आहे की, त्याच्या जागी आम्ही तासाला बसणार आणि आम्ही स्वतः त्याला शिवणार आहोत.

२) महाविद्यालयीन विद्यार्थ्याची अशीही तक्रार: पदव्युत्तर शिक्षण घेणार्‍या एका विद्यार्थ्याची तक्रार होती की, आमचा वडिलोपार्जित कृषी व्यवसाय आहे. कॉलेजला आलो की, आम्ही फक्त अभ्यासच करतो ही आमच्या पालकांची धारणा आहे. पण आम्ही घरात आहोत म्हणजे आम्ही काही अभ्यास करणार नाही. यामुळे आम्ही ऑनलाईन तासाला बसलो की, पालक गल्ल्यावर बसायला आम्हाला सांगतात आणि त्यांचे ऐकले नाही तर मोबाईलमध्ये कधी अभ्यास होतो का? असे टोमणे मारले जातात. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांची मोबाईलबद्दलची असलेली मानसिकता. त्यांना वाटते की, मोबाईल हा फक्त खेळण्यासाठीच आहे.