ऑनलाईन बदलीत जादा देण्यात आलेले शिक्षक समायोजनात अतिरिक्त ठरवा

0

शिक्षकांचे जि.प.शिक्षण सभापतींना दिले निवेदन
जळगाव – जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची शिक्षक समायोजन प्रक्रिया सध्या सुरू आहे. या शिक्षक समायोजन प्रक्रियेत अन्यायकारक रित्या अतिरिक्त ठरविण्यात आल्याचा आरोप जळगाव तालुक्यातील काही शिक्षकांनी केला आहे. या वर्षी जिल्हापरिषदेच्या ऑनलाईन बदल्या झाल्या.बदल्यांमध्ये पटसंख्येवर आधारित मंजूर पदांनूसार शिक्षक देणे अपेक्षित असते. मात्र जळगाव तालुक्यातील काही जि.प.शाळांवर विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर मंजूर शिक्षक पदांपेक्षा जादा शिक्षक ऑनलाईन बदलीत शाळेवर देण्यात आले.

ज्या शिक्षकांना शाळेत पद रिक्त नसतांना नियुक्ती दिली ते शिक्षक त्या शाळांवर अतिरिक्त ठरतात मात्र समायोजन प्रक्रियेत शाळेवर अगोदरच जादा दिलेल्या शिक्षकांना अतिरिक्त न ठरवता शाळेत जे शिक्षक सेवाज्येष्ठ आहेत त्यांना अतिरिक्त ठरविले आहे व यामुळे त्यांची समायोजन प्रक्रियेत दुसर्‍या शाळेत बदली होणार आहे. जर शाळेत पद रिक्त नसताना शिक्षक दिलाच नसता तर आम्ही आज अतिरिक्त ठरलोच नसतो असे निवेदन दिलेल्या शिक्षकांचे म्हणणे आहे. शाळेत अगोदर जादा शिक्षक देणे व त्यांनतर आम्हाला अतिरिक्त करणे हा आमच्यावर अन्याय असल्याचे शिक्षकांचे म्हणणे असून यावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या 6 ऑगस्ट 2018 च्या पत्रानुसार ऑनलाईन बदलीत जादा देण्यात आलेल्या शिक्षकांना अतिरिक्त ठरवावे व आमची नावे वगळावीत असे निवेदन जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापतींना देण्यात आले.

या शिक्षकांनी दिले निवेदन
शिक्षण सभापतींनी यावर योग्य निर्णय घेतो व कोणावरही अन्याय होणार नाही असे आश्वासन शिक्षकांना दिले. यावेळी शिक्षकांसोबत शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष ईश्वर सपकाळे, राधेश्याम पाटील, नाना पाटील, राजेश जाधव, संदिप पवार, शिक्षक संदिप पाटील, गायत्री जैन, सोनल महाजन, सुनंदा पाटील, आत्माराम कुंभार हे उपस्थित होते. तसेच समायोजना अगोदर शिक्षक पदोन्नती करण्यात याव्या अशीही शिक्षक सेनेने मागणी केली.
-फोटो आहे

Copy