Private Advt

ऑनलाईन पद्धतीने क्षेत्रभेट

 

जळगाव – विवेकानंद प्रतिष्ठान संचलित प्राथमिक शाळा , वाघनगर येथे इयता १ ली व २ री च्या विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी सध्याच्या परिस्थितीत दि .२२/०१/२२ वार शनिवार रोजी ऑनलाईन पद्धतीने क्षेत्रभेट नेण्यात आली . विद्यार्थ्यांना सकस व पौष्टीक आहार या इंग्रजी विषयानुरूप शरीरासाठी फळांची आवश्यकता , त्यांचे महत्त्व , फायदे , त्यांचे विविध उपयोग त्यात असणाऱ्या व्हिटॅमिनचे फायदे ,प्रमाण , मोजमाप इ गोष्टी विद्यार्थांना प्रत्यक्ष मुलाखतीच्या आधारे सौ . दिपाली कापडणे दीदी यांनी विद्यार्थ्यांना सांगितल्या.
इयत्ता 2 री या वर्गासाठी गणित या विषयाला अनुसरून ऑनलाईन च्या माध्यमातून किराणा दुकानाला भेट देण्यात आली. यावेळी मुलांना वजन कशा प्रकारे घेतात ?वजन मोजायला कोणते साधन वापरतात ?यासाठी वाघ नगर परिसरातील “मनस्वी किराणा” दुकानाला भेट देण्यात आली.यामध्ये किराणा दुकान चे ओनर ( मालक ) सौ. चंद्रकला बागडे या ताईंनी मुलांना प्रत्यक्षात वजन काटा दाखविला आणि वजन काट्याची ओळख करून दिली तसेच एक किलो ,अर्धा किलो, 200 ग्राम, पन्नास ग्राम , आशा विविध वजनाची माहिती सांगितली आणि इलेक्ट्रिक वजन काट्या बद्दल देखील माहिती सांगितली. यावेळी विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात साखर मोजून दाखविण्यात आली. सर्व मुलांनी दुकानदार ताईंनी दिलेली माहिती शांतपणे ऐकली आणि वजन कसे मोजायचे हे पण लक्षात घेतले . इयत्ता 2 री या वर्गासाठी परिसर अभ्यास या विषयाला अनुसरून ऑनलाईन च्या माध्यामातून वृत्तपत्र वार्ताहाराला भेट देण्यात आली
या वृत्तपत्र भेटीला लाभलेले जळगाव शहर वृत्तपत्र विक्रेता मंडळाचे अध्यक्ष श्री.विलास वाणी सर यांनी उत्तम मार्गदर्शन दिले . देशात घडत असलेल्या घटना ., खेळांविषयी माहिती ही आपल्यापर्यंत पोहोचायला हवी यासाठी कर्मचाऱ्यांना कुठल्या प्रकारची तडजोड करावी लागते. वृत्तपत्र कशा पद्धतीने, कुठे छाप ला जातो व छपाई कामास लागणारा वेळ नंतर पेपर छपाई झाल्यानतर त्याची विल्हेवाट कशी लावायची इत्यादी विषयी विलास वाणी यांचे सखोल मार्गदर्शन लाभले . यासाठी शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय हेमराज पाटील सर तसेच समन्वयिका जयश्री वंडोळे यांचे मार्गदर्शन लाभले