Private Advt

ऑनलाईन ट्रेडिंगच्या नावाखाली तरुणाला सहा लाखांचा गंडा

जळगाव : जळगावातील मोहाडी रोडवरील तरुणाची ऑनलाईन ट्रेडींगमध्ये चांगला नफा मिळवून देण्याच्या नावाखाली तब्बल पाच लाख 76 हजारांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सायबर पोलिसात गुन्हा दाखल
सचिन अशोककुमार मंदान (25, एक्झोटीक अपार्टमेंट, मोहाडी रोड,) जळगाव हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. त्यांचे जनरल स्टोअर्स असून मार्च 2021 पासून ते आतापर्यंत त्यांना इंस्टाग्राम या सोशल मीडिया साईटवरील ट्रेडर्स काजल या फायनान्शीयल अ‍ॅडव्हायझर अ‍ॅण्ड ट्रेडर्स या नावाचे इन्स्टाग्राम या खातेदाराने ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये चांगला नफा मिळेल, असे आमिष दाखविले. समोरील अनोळखी व्यक्तीने सचिन मंदान यांच्याकडून डिमॅट खात्याचा युजर आयडी व पासवर्ड घेऊन शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना अज्ञात व्यक्तीने मंदार यांच्याकडून वेळोवेळी दिलेल्या खाते क्रमांकावर पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार सचिन मंदार यांनी पाच लाख 76 हजार 151 रुपये भरले. यात त्यांना एकाही रुपयांचा फायदा झाला नाहीख, असे लक्षात आल्यावर त्यांनी जळगाव सायबर पोलिसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून ट्रेडर्स काजल फायनान्शियल डव्हायझर अँड ट्रेडर्स या नावाचे इन्स्टाग्राम खातेधारकाविरोधात जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे करीत आहे.