ऑनलाईन औषध विक्री विरोधात औषध विक्रेत्यांचा 28 रोजी बंद

0

भुसावळात संघटनेतर्फे तहसील प्रशासनाला निवेदन

भुसावळ- राज्यासह देशात ऑनलाईन सर्रास विकल्या जाणार्‍या औषध विक्री विरोधात शुक्रवार, 28 रोजी अखिल भारतीय औषधी विक्रेता संटघनेतर्फे बंद पुकारण्यात आला असून या बंदमध्ये भुसावळातील विक्रेतेही सहभागी होणार असून त्या संदर्भातील निवेदन संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ काबरा व सचिव ईश्‍वरदास चौधरी यांच्या नेतृत्वात बुधवारी तहसील प्रशासनाला देण्यात आले.

अखिल भारतीय औषध विक्रेत्यांचा बंद
अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने प्रशासनाला दिलेल्या निवेदनानुसार राज्यासह देशात बेकायदेरशीरीत्या इंटरनेट फार्मसीच्या माध्यमातून ऑनलाईन औषधांची विक्री सुरू आहे. प्रशासनाची त्याबाबत सकारात्मक भूमिका असल्याने शुक्रवार, 28 सप्टेंबर रोजी अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने बंदचे आवाहन केले आहे. बंद काळात भुसावळात अत्यावश्यक औषधांची गरज भासल्यास तालुकाध्यक्ष राजाभाऊ काबरा (9923445008), सचिव ईश्‍वरदास चौधरी, जेडीएमडीएचे पदाधिकारी श्रीकांत पाटील, शैलेश राठोड, अविनाश महाजन यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Copy