ऑनलाइन चोरांचा धुमाकूळ; एकास 40 हजारात गंडविले

0

धुळे। साक्री रोडवरील श्रीहरी सोसायटीत रहाणार्या एका मिस्तरीला मोबाईलवरुन एटीएमची तसेच बँक खात्याची माहिती विचारत तब्बल 40 हजाराचा चुना लावल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली असून गुन्हाही दाखल झाला आहे. याबाबत माहिती अशी की, श्रीहरी सोसायटीत रहाणारे दिलीप रतन मिस्तरी यांना दि.22 एप्रिल रोजी 9073296356 या मोबाईलवरुन एक कॉल आला.

त्याने बँक खात्यासह एटीएमच्या नंबरची माहिती घेतली. त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या कुमारनगर शाखेतून मिस्तरी यांच्या खात्यातील 39 हजार 997 रुपये काढण्यात आले. हा प्रकार लक्षात आल्याने दिलीप मिस्तरी यांनी शहर पोलिसात रितसर तक्रार केली असून ज्या मोबाईलवरुन त्यांना कॉल आला होता त्या मोबाईलधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तोरडमल हे
करीत आहेत.