ऑटोक्लस्टर सभागृहात शिवसेनेतर्फे पार पडला ज्येष्ठ नागरिकांचा स्नेहमेळावा

0

स्वकष्टाने कमवलेली संपत्ती जिवनाच्या अखेरपर्यंत आपल्याजवळच ठेवा!
खासदार श्रीरंग बारणे यांनी केले विचार व्यक्त
पिंपरी: ज्येष्ठ नागरिकांचे पिंपरी-चिंचवड शहराच्या जडण-घडणीत मोठे योगदान आहे. शहर नियोजनात त्यांच्या अनुभवाचा मोठा उपयोग होते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करणे आपले कर्तव्य आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांनी भावनिक न होता कष्टाने कमवलेली आपली संपत्ती आपल्याजवळच ठेवावी, असे मत खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केले. चिंचवड येथील ऑटोक्लस्टर सभागृहात ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून शिवसेनेतर्फे रविवारी ज्येष्ठ नागरिकांचा स्नेहमेळावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, जिल्हा महिला संघटिका शादान चौधरी, शहरप्रमुख योगेश बाबर, महिला संघटिका अ‍ॅड.उर्मिला काळभोर, विधानसभा संघटक अनंत कोर्‍हाळे, प्रमोद कुटे, विधानसभा महिला संघटिका सरिता साने, अनिता तुतारे, नगरसेवक सचिन भोसले, नगरसेविका रेखा दर्शले, माजी नगरसेवक मधुकर बाबर, राम पात्रे, कामगार नेते जयसिंग पवार आदी उपस्थित होते.

अनुभवाची शिदोरी असते
खासदार श्रीरंग बारणे पुढे म्हणाले की, जेष्ठ नागरिकांकडे अनुभवाची शिदोरी आहे. तुमचे मार्गदर्शन पिंपरी-चिंचवडसाठी मोलाचे आहे. शहरातील विरंगुळा केंद्र हे जेष्ठ नागरिकांसाठी सुख-दुःखाची देवाण-घेवाण करण्याचे ठिकाण असते. वृद्धापकाळात अनेकांना मानसिक आधार हवा असतो. अशावेळी शिवसेना कायम तुमच्या बरोबर असेल. ज्येष्ठ नागरिकांनी भावनिक न होता कष्टाने कमवलेली आपली संपती कोणाच्या हातामध्ये अथवा नावाने करू नये. आज परिस्थिती बदलली आहे. आई-वडीलांना वृद्धाश्रमात टाकण्याची संख्या वाढत चालली आहे. ही समाजासाठी चिंतेची बाब असुन आपण दिलेले संस्कार कमी पडत नसुन पैश्याच्या मागे धावणारी प्रवृत्ती समाजात वाढत चालली आहे. प्रत्येक तरुण स्वत:चा विचार करू लागला आहे, म्हणुनच आई-वडीलांकडे लक्ष कमी होत चालले आहे.

ज्येष्ठ नागरिक संघाचे केले सत्कार
यावेळी खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिक संघाचे सत्कार कऱण्यात आले. त्यात ज्येष्ठ नागरिक संघ गणेशनगर थेरगाव, स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ थेरगाव, अशोक ज्येष्ठ नागरिक संघ थेरगाव, रॉयल कोर्ट ज्येष्ठ नागरिक संघ थेरगाव, आनंद ज्येष्ठ नागरिक संघ वाकड, गुरुदेव दत्त ज्येष्ठ नागरिक संघ वाकड, महात्मा फुले ज्येष्ठ नागरिक संघ शाहुनगर, सिध्दीविनायक ज्येष्ठ नागरिक संघ संभाजीनगर, ज्येष्ठ नागरिक संघ मोरवाडी, जिव्हाळा ज्येष्ठ नागरिक संघ विद्यामंदिर, जय हनुमान ज्येष्ठ नागरिक संघ काळभोरनगर, ज्येष्ठ नागरिक संघ चिंचवडगाव, ज्येष्ठ नागरिक संघ बिजलीनगर, ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळ चिंचवडगाव, काकडे पार्क ज्येष्ठ नागरिक संघ, काकडे टाऊनशिप ज्येष्ठ नागरिक संघ, मोरया गोसावी क्रीडांगण ज्येष्ठ नागरिक संघ, चिंतामणी ज्येष्ठ नागरिक संघ वाल्हेकरवाडी, दापोडी, पिंपळे सौदागर, प्राधिकरण आदी संघांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शहरप्रमुख योगेश बाबर यांनी स्वागत केले, तर जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, महिला संघटिका अ‍ॅड.उर्मिला काळभोर, माजी नगरसेवक मधुकर बाबर, कामगार नेते जयसिंग पवार यांनी मार्गदर्शन केले

चिंचवडगाव, काकडे पार्क ज्येष्ठ नागरिक संघ, काकडे टाऊनशिप ज्येष्ठ नागरिक संघ, मोरया गोसावी क्रीडांगण ज्येष्ठ नागरिक संघ, चिंतामणी ज्येष्ठ नागरिक संघ वाल्हेकरवाडी, दापोडी, पिंपळे सौदागर, प्राधिकरण आदी संघांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शहरप्रमुख योगेश बाबर यांनी स्वागत केले, तर जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, महिला संघटिका अ‍ॅड.उर्मिला काळभोर, माजी नगरसेवक मधुकर बाबर, कामगार नेते जयसिंग पवार यांनी मार्गदर्शन केले