ऑक्सिजन गळतीमुळे २२ रुग्णांना मृत्यू

नाशिक – झाकीर हुसेन रुग्णालयात मानवी चुकीमुळे ऑक्सिजनचा तुटवडा झाल्याने २२ रुग्णांना मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली. ऑक्सिजन प्लांटमध्ये गळती झाल्याने ही दुर्घटना घडली. रुग्णालयात १५० रुग्ण दाखल होते. यामधील व्हेंटिलेटरवर असणाऱ्या २३ जणांपैकी २२ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती सोमर येत आहे. या घटनेनंतर प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत असून कारवाईची मागणी केली जात आहे.

माझी आई कोंबडी सारखी फाडफाडून मेली.
या घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या एक महिलेच्या मुलीने प्रसार माद्यामांशी बोलताना म्हणाली कि , ऑक्सिजन न मिळाल्याने एकद्या कोंबडी प्रमाणे माझी आई फाडफाडून मेली.