ऑक्सिजनअभावी रुग्णाचा मृत्यू डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप

जळगाव- मेहरुण परिसरातील सारा हॉस्पिटलच्या कोविड सेंटरमधील एका महिला रुग्णाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आईचा मृत्यू झाला, असा आरोप मृत रुग्णाचा मुलगा व मुलीने केला आहे. परंतु, हा आरोप डॉक्टरांनी नाकारला आहे.
सारा हॉस्पिटलच्या कोविड सेंटरमध्ये सावदा येथील प्रतिभा कैलाससिंग परदेशी या महिला रुग्णास 16 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. या रुग्णाची प्रकृती गंभीर नव्हती. पण, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आईचा मृत्यू झाला. हा प्रकार रुग्णांच्या नातेवाईकांच्या लवकर लक्षात आला. अन्यथा इतर रुग्णांचेही जीव धोक्यात आले असते, असा आरोप मृत महिलेचा मुलगा व मुलीने केला आहे. याबाबत कळताच महापौर जयश्री महाजन यांनी घटनास्थळी भेट देवून रुग्णांच्या नातेवाईकांची विचारपूस केली.