ऐनपूर महाविद्यालयात शिष्यवृत्तीचे वितरण

0

निंभोरा । येथुन जवळच ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात प्रथम वर्ष तसेच तृतीय वर्ष वर्गातील विद्यार्थ्यांना हिंदुस्थान पेट्रोलीयम कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे (एचपीसीएल) शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. सदर शिष्यवृत्तीचे वाटप एचपीसीएलचे अधिकारी बी.एन. राव आणि किशोर नारायणे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे.बी. अंजने यांनी महाविद्यालयाच्या विविध विद्यार्थीभिमुख उपक्रमांविषयी माहिती दिली. बी.एन. राव हिंदुस्थान पेट्रोलीयम कॉर्पोरेशन लिमिटेडविषयी उपस्थितांना माहिती दिली.

उपक्रमांची दिली माहिती
किशोर नारायणे यांनी एचपीच्या उपक्रमाची माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीतून मिळालेल्या रकमेतून शैक्षणिक साहित्य खरेदी करून, परीक्षेत यश संपादन करावे तसेच समाजाच्या, देशाच्या प्रगतीसाठी सतत जागरूक राहावे, असे प्रतिपादन केले. भागवत पाटील यांनी आभार व्यक्त केले.

यांनी घेतले परिश्रम
तसेच महाविद्यालयाला वेळोवेळी सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्रीराम पाटील, सचिव संजय पाटील तसेच सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नितीन बारी यांनी केले तर आभार संयोजक प्रा. आर. बी. खंडारे यांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रा. व्ही.एन. रामटेके, प्रा. दिलीप सोनवणे, के.एस. अवसरमल, महेंद्र महाजन, नितीन महाजन, गोपाल पाटील, पवन गजरे यांनी परिश्रम घेतले.