एस.टी.च्या १२ हजार कामगारांना पगारवाढ

0

मुंबई : राज्यातील १२ हजारांहून जास्त एस.टी. कर्मचाऱ्यांना एक एप्रिलपासून पगारात वाढ मिळण्याची संधी आहे. तशी घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी शुक्रवारी विधिमंडळात केली.

राज्यात साधारण एक लाख १० हजार कर्मचारी आहेत. त्यातील १२ हजार ५१४ कर्मचारी २५ संवर्गात कनिष्ठ वेतनश्रेणीत कार्यरत आहेत. ही वेतनश्रेणी तीन वर्षांसाठी आहे. त्याचा कालावधी सरकारने एक वर्षापर्यंत खाली आणला आहे. यामध्ये सहा महिने पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्याला दरमहा ५०० रूपयांची वाढ देण्यात येणार आहे. एक वर्ष पूर्ण झाल्यावर या कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मिळणार आहे, असे रावते यांनी सांगितले. एस.टी.मधील मान्यताप्राप्त संघटनेने कनिष्ठ वेतनश्रेणीच रद्द करावी अशी मागणी केली होती तर इतर संघटनांनी त्याचा कालावधी कमी करण्याची मागणी केली होती, असेही ते म्हणाले.