एस.टी.ची हंगामी भाडेवाढ जाहीर

0

मुंबई । एसटी महामंडळाने दिवाळीसाठी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला असून सर्व प्रकारच्या बस सेवांमध्ये ही वाढ 10 ते 20 टक्के एवढी आहे. 14 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबपर्यंत प्रवास करणार्‍या प्रवाशांना यामुळे जादा भाडे द्यावे लागेल. एक महिनाआधीच बसचे आरक्षण होत असल्याने सध्या तिकीट आरक्षण केंद्रावर जादा भाडे आकारणीला सुरुवातही करण्यात आली आहे. खासगी वाहतुकीचे आव्हान पेलू शकणारी व्यवस्था एसटी महामंडळाने करण्याशिवाय अशी भाडेवाढ योग्य नसल्याचे बोलले जात आहे.

30 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा अधिकार
हंगामानुसार बसच्या भाडयमध्ये 30 टक्क्यांपर्यंत भाडे वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा अधिकार एसटी महामंडळाला आहेत. त्यानुसार एसटी महामंडळाकडून दिवाळीत भाडेवाढ केली जाते.यंदाही दिवाळीसाठी भाडेवाढ करण्यात आली असून ही सलग तिसरी भाडेवाढ आहे. साधी बस व रातराणीमध्ये 10 टक्के, निमआराम बस सेवांसाठी 15 टक्के आणि वातानुकूलित बससाठी 20 टक्के भाडेवाढ आहे. या भाडेवाढीमुळे एसटी महामंडळाने चांगल्या महसुलाचे उद्दिष्ट ठेवले आहे. गेल्या वर्षी दिवाळीत केलेल्या भाडेवाढीमुळे 36 कोटी रुपये, तर त्याआधीच्या वर्षी 42 कोटी रुपये महसूल एसटीला मिळाला होता.

Copy