“एस. एस. बी. टी. अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून गिरणापात्रातील निर्माल्य संकलन”

0

जळगाव: बांभोरी येथील श्रम साधना बॉम्बे ट्रस्ट संचालित अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांच्या मदतीने गिरणपात्रात गणेश विसर्जनानंतरजमा झालेल्या निर्माल्याचे संकलन करून त्याचे शास्त्रोक्त पद्धतीने विघटन करण्यास सहकार्य केले. गिरणा पात्रात गणेश मुर्तींचे विसर्जनासाठी मोठया संख्येने शहरातील नागरिकयेत असतात. विसर्जनादरम्यान गणेशोत्सव काळात जमा झालेले निर्माल्य देखील नदीपात्रात टाकण्यात येते. निर्माल्याचे विघटन होण्यास बराच वेळ लागत असल्याने नदीपरिसरात जलप्रदूषणाची समस्यां निर्माण होते.

यासंदर्भात उपाययोजना म्हणुन जळगाव महानगरपालिका आयुक्त श्री. चंद्रकांत डांगे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत आयोजित सभेतीलसूचनेनुसार एस. एस. बी. टी. महाविद्यालयातील प्रा. एम हुसैन, प्रा. एस. पी. शेखावत, प्रा. एस. एल. पाटील व प्रा. प्रवीण शिरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली १०० विद्यार्थ्यांच्या समूहानेरविवार, गणेश विसर्जनाच्या दिवशी गिरणापात्रात साचलेल्या निर्माल्यचे संकलन करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यास मदत केली.