एसटी महामंडळ घेणार दोन हजार कोटींचे कर्ज

0

मुंबई: कोरोनामुळे राज्याची आर्थिक स्थिती बिघडली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारासाठीही पैसे नसल्याची स्थिती आहे. त्यातच एसटी महामंडळाला कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. हजारो कोटींचे उत्पन्न घटले आहे. दरम्यान आता एसटी महामंडळाला सावरण्यासाठी कर्ज घेण्याशिवाय पर्याय नसल्यानेचे एसटी महामंडळ दोन हजार कोटींचे कर्ज घेणार आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन आणि सेवानिवृत्त वेतन देण्यासाठी कर्ज घेणार आहे. या कर्जापोटी दर महिन्याला २० कोटी व्याज द्यावे लागणार आहे. कोरोनामुळे राज्याची आर्थिक स्थिती बिकट झालेली असतांनाच परतीच्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी १० हजार कोटींची घोषणा राज्य सरकारने केली आहे. त्यामुळे राज्यावर आर्थिक बोजा वाढणार आहे. कर्ज घेण्याचा पर्याय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही सुचविले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील कर्ज घेणे चुकीचे नसल्याचे म्हटले आहे.