एसटीच्या धडकेत पादचारी वृद्धाचा मृत्यू

0

चाकण : एसटी बसच्या धडकेत पादचारी वृद्धाचा मृत्यू झाला. हा अपघात 15 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर इंद्रायणी नदीच्या पुलावर झाला. संजय पिलाजी रोमणे (वय 51, रा.नाशिक) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोपान कुशाबा कोळी (वय 63, रा. मोशी) असे अपघातात मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संजय रोमणे हा राज्य परिवहन चालक म्हणून नोकरी करतो. 15 ऑक्टोबर रोजी ती नाशिक-पुणे ही बस (एम एच 06 / एस 8895) घेऊन पुण्याच्या दिशेने येत होता. चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंद्रायणी नदीच्या पुलावर बस आली असता बसची पादचारी वृद्धाला धडक बसली. यामध्ये पादचारी वृद्ध गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती न देता बसचालक निघून गेला. पादचारी वृद्धाला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.