एसएमआयटी रस्त्यावरील नाल्याचे काम निकृष्ट ; महापौरांनी खडसावले

0

जळगाव: गेल्या दीड वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून संथगतीने सुरू असलेल्या एसएमआयटी रोडवरील नाल्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे महापौर भारती सोनवणे यांच्या पाहणीत निदर्शनात आले. एक लाथ मारली तर भिंत कोसळेल इतके निकृष्ट काम असतानाही अधिकारी गुणवत्ता तपासत नसल्याने अधिकार्‍यांची खरडपट्टी काढली. महास्वच्छता अभियानाच्या निमित्ताने महापौर सोनवणे बुधवारी मुक्ताईनगर, एसएमआयटी कॉलेज परिसरात पाहणीसाठी आल्या होत्या. या वेळी त्यांनी नाल्याच्या कामाची पाहणी केली. नाल्याची भिंत एका रेषेत नसून नागमोडी आहे. गटारीचे काम इतके निकृष्ट दर्जाचे आहे की लाथ मारताच भिंत कोसळेल अशी स्थिती आहे. मात्र, असे असतानाही अधिकारी लक्ष देत नाहीत. गुणवत्ता तपासत नसल्याने महापौरांनी अधिकार्‍यांना कडक भाषेत आपली नाराजी बोलून दाखवली. मक्तेदाराकडून चांगल्या कामाची अपेक्षा असताना अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याने या कामाची चौकशी करण्याची मागणी महापौरांकडे करण्यात
आली आहे.

Copy