एलसीबीच्या पोलीस निरीक्षकपदी बापू रोहम यांची नियुक्ती

0

पोलिस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी केली नियुक्तीपत्र

जळगाव- आठवडाभरापासून रिक्त असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकपदी रामानंद नगरचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात पोलीस निरीक्षक सुनिल कुऱ्हाडे यांची बदली झाल्याने त्यांनी आपल्या पदभार सोडला होता. आज जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी लेखी पत्राद्वारे पो.नि. रोहम नियुक्तीपत्र देण्यात आले.

पोलीस निरीक्षक बापू रोहम हे गेल्या दोन वर्षांपासून रामानंद नगर पोलीस स्टेशन कारभार यशस्विरित्या संभाळला आहे. बऱ्याच दिवसांपासून एलसीबीच्या पोलीस निरीक्षकपद रिक्त असल्याने पोलीस प्रशासनात चर्चा सुरू होती. श्री.रोहम यांची पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती केल्यानंतर चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे. पोलीस अधिक्षक शिंदे यांच्या उपस्थितीत पदभार स्विकारल्यानंतर एलसीबी विभागातील कर्मचाऱ्यांची बैठक सुरू असल्याची माहिती विश्वसनिय सुत्रांकडून मिळाली आहे.

गेल्या महिन्यांपासून जिल्ह्यात होणाऱ्या अवैध धंद्यांच्या विरोधात जिल्हा पोलीस प्रशासनाने कारवाईचे सत्र सुरू केले आहे. तर शहरात अवैध धंद्यांसह होणारे इतर गुन्हे रोखण्यासाठी एलसीबीचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक बापू रोहम यांची भूमीका कशी असेल याकडे जिल्हा पोलीस प्रशासनाचे लक्ष लागून आहे.

Copy