Private Advt

एरंडोल शहरात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू

एकाने घेतला गळफास तर दुसर्‍याने केले विष प्राशन

भुसावळ/एरंडोल : शहरात एकाने गळफास घेऊन तर दुसर्‍याने विष प्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणी एरंडोल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

एकाने घेतला गळफास
एरंडोल येथील हनुमान नगरातील संतोष लक्ष्मण महाजन (49) यांनी शेतातील निंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. रविवारी पहाटे ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होवू शकले नाही.

मध्यप्रदेशातील इसमाचा मृतदेह आढळला
दुसर्‍या घटनेत कासोदा रस्त्यावरील शेत शिवारात रायसिंग (29, रा.साहदर, तितरवांगली, ग्रा.पं.सिरवेल, खरगोन, मध्यप्रदेश) यांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. याबाबत पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असता त्याच्या खिशात विषारी औषधांची बाटली आढळली. संबंधित इसमाने विष घेऊन आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान दोघेही मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.