एरंडोल शहरात आज १४ पॉझिटिव्ह रुग्णांची भर

0

एरंडोल: एरंडोल शहरात आज १३ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून एक रुग्ण खाजगी तपासणीत पॉझिटिव्ह आला आहे असे एकूण १४ रुग्ण आहेत.

एरंडोल तालुक्यात एकूण १३७ पॉझिटिव्ह रुग्ण असून पैकी शहरात ८९ व ग्रामीण भागात ४८ याप्रमाणे आहेत. विभागात ५३३ पैकी आज १४१ ऍक्टिव्ह केसेस आहेत. तसेच कन्टेन्टमेंट झोन बाहेर केसेस मिळण्याचे प्रमाण १०% च्या आत आहे. ७०%पेक्षा जास्त पोसिटीव्ह कॉन्टॅक्ट tracing मधून आहेत. तसेच एरंडोल विभाग रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६८% आहे. अशी माहिती प्रांत अधिकारी विनय गोसावी यांनी दिली आहे.
तसेच आज संध्याकाळी एरंडोल कोबिर सेंटर मधून १८ कोरणा मुक्त रुग्णांचे यशस्वी उपचार करून घरवापसी करण्यात आली आहे. कोरोना मुक्त रूग्णांना पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन निरोप देण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी विनय गोसावी, तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कैलास पाटील, डॉ. फिरोज शेख, डॉक्टर रोहित वाणी, डॉक्टर पळशीकर आदी उपस्थित होते.
यामध्ये ११ एरंडोल शहर, ५ विखरण, २ कासोदा होते.
विशेष हे की तालुक्यातील १३७ कोरोना रुग्णांपैकी ८४ रुग्ण बरेच बरे होऊन घरी परतले आहेत ही दिलासा देणारी बाब आहे.

Copy