Private Advt

एरंडोल शहरातील विवाहितेची आत्महत्या : एकाविरोधात गुन्हा

एरंडोल : जहांगीरपुरा भागात राहणार्‍या रुपाली विश्वनाथ पाटील (34) या विवाहितेने 23 एप्रिल 2022 रोजी दुपारी राहत्या घराच्या दुसर्‍या मजल्यावर गळफास घेवून आत्महत्या केली होती. मृत्यूपूर्वी विवाहितेने सुसाईड नोट लिहिल्याने एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मृत्यूपूर्वी लिहिली सुसाईड नोट
एरंडोल शहरातील विवाहिता रुपाली पाटील यांनी 23 एप्रिल रोजी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली आहे. त्यात एका व्यक्तीने केलेली बदनामी सहन न झाल्याने आत्महत्या करीत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. माझ्या आत्महत्या करण्याशी माझ्या घरच्यांचा काही दोष नाही, माझी अज्ञात व्यक्तीने केलेली बदनामी मी सहन करू शकले नाही. घरातील देव्हार्‍याजवळ पर्स असून यात मी शिलाई काम करून जमवलेली रक्कम आहे. ती माझ्या मुलांची आहे, असा मजकूर चिठ्ठीत लिहिलेला आहे. आयुष्यात मुलांसाठी खूप करायचे होते. मात्र मी हरले असून मुलगा व मुलीस सांभाळून घ्या, असा मजकूर त्यात आहे. याबाबत श्रीराम राजाराम पाटील यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.