एरंडोल येथे “शेतकरी ते उपभोक्ता”संकल्पने अंतर्गत भाजीपाला विक्री खरेदी केंद्राचा शुभारंभ

0

एरंडोल – कृषी विभागातर्फे “शेतकरी ते उपभोक्ता “या संकल्पने अंतर्गत येथे आदर्श नगरात दत्त मंदिरानजीक भाजीपाला विक्री खरेदी केंद्र २९ मार्च २० रोजी सुरू करण्यात आले. उंबरे येथील शेतकरी बचत गट (जय बाबाजी शेतकरी बचत गट) यांच्यामार्फत भाजीपाला विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे.

या केंद्राच्या शुभारंभप्रसंगी तालुका कृषी अधिकारी शरद बोरसे, कृषी सहाय्यक धनंजय सावंत, परमेश्वर बेडगे, कुंदन पाटील, उमाजी मुरमुरे, वैभव पाटील, ईश्वर सोनार, नागरिक उपस्थित होते.

Copy