एरंडोल येथे महिला दिन उत्साहात

0

एरंडोल । शहरातील विविध महिला मंडळे व संस्थांनी जागतिक महिला दिवस उत्साहात साजरा केला महिला मंडळानी एकत्रित येऊन झाशीच्या राणीच्या वेशभूषेत संपूर्ण शहरातून शोभायात्रा काढून शहरवासियांचे लक्ष वेधले. रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून करण्यात आली झाशीच्या राणीची वेशभूषा रत्ना देवरे यांनी केली महिलांनी आपल्या ड्रेसकोडनुसार रॅलीत भाग घेतला. नगरपालिका सभागृहात महिला मेळावा व आरोग्य शिबीर झाले डॉ. गीतांजली ठाकुर, डॉ.प्रीती चौधरी व डॉ.स्नेहा राठी यांनी महिलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ.उज्वला राठी होत्या . सौ प्रतिभा पाटील , जयश्री पाटील, वर्षा शिंदे, हर्षाली महाजन , आरती महाजन, सुरेखा चौधरी, बानोबी बागवान आदी उपस्थित होत्या.