एरंडोल येथे मराठा वधू-वर नोंदणी मेळावा

0

एरंडोल : येथे मराठा मंगल विवाह व प्रबोधन स्वयंसेवी संस्थाचा वधू-वर नोंदणी मेळावा दि.16 डिसेंबर रोजी य.च.शि.प्र. मंडळाचे अध्यक्ष अमित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला. मेळाव्याचे उद्घाटन कृषी अधिकारी एस.टी.पाटील व प्रा.एन.आर.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सदर मेळाव्यास संस्थेचे संचालक आर.बी.पाटील व डॉ.राजेश पाटील यांनी विवाह नोंदणीबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी प्रा.व्ही.डब्ल्यू.पाटील (धरणगाव), किशोर पाटील कुंझरकर, डॉ.सुरेश पाटील. धरणगावचे पोनि श्री सोनवणे, श्री.साळुंखे, के.डी.पाटील, श्री.भोसले, श्री.शिंदे, के.एस.पाटील, श्री.सैंदाणे, डॉ.रमाकांत पाटील, एस.ए.इंगळे, गणेश पाटील व समाजबांधवाच्या उपस्थितीत कार्यक्रम यशस्वी पार पडला.