एरंडोल येथे ट्रक पुलावरून कलंडला

0

एरंडोल – मंगळवार 6 रोजीच्या मध्यरात्री शहराला लागून असलेल्या अंजनी नदीच्या पुलावरून ट्रक (एम.एच.18 ए.ए.3654) खाली कोसळला. सदरील ट्रक हा एरंडोल कडून कासोद्याकडे जात होता. चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला असून चालक जखमी झाला असून क्लिनरला किरकोळ मार बसला आहे. सुदैवाने सदर अपघातात कुठलीही प्राणहानी झाली नाही दरम्यान सदर ट्रक हा मध्य रात्री कोसळल्याने मोठी दुर्घटना टळली असल्याचे समजते. तसेच या पुलावर दिवसा खूप मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असल्याने या पुलाला कुठल्याही प्रकारचे संरक्षक कठडे नाहीत. त्यामुळे कासोद्याकडे जातांना वळणावरून कायम लहानमोठ्या दुर्घटना घडत असतात.