एरंडोल येथे कार्यशाळेत गिरीश कुलकर्णी यांचे मार्गदर्शन

0

एरंडोल – आपल्या पाल्यावर फक्त अपेक्षांचा डोंगर न लादता त्यांच्या कडून प्रेमाने, विश्वासाने, समजुतीने काम करून घ्यावी. आपण डॉक्टर, इंजिनियर नाही बनू शकलो तर ते स्वप्न आपल्या पाल्याकडून करण्याचा प्रयत्न करतो तर ते चुकीचे असून आपल्या पाल्याला कोणत्या क्षेत्राची आवड आहे. त्या क्षेत्रात त्याला करियर करायला सांगा तसेच पुरुष पालकांना त्यांनी कठोर शब्दात त्यांच्या पालकत्वाची जणीव करून दिली. एरंडोल के.डी.पाटील इंग्लिश मेडियम स्कुल येथे आयोजित सुजाण पालकत्व कार्यशाळेत गिरीश कुलकर्णी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाअध्यक्ष अमित पाटील हे होते.

पाल्याला समजून घेण्याचे केले आवाहन
मान्यवरांचे स्वागत गीत गाऊन करण्यात आले.सुरुवातीला माण्यावाराच्या हस्ते सरस्वती पुजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन देवेंद्र भावसार, प्राचार्य.डॉ.ए.आर.पाटील हजर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य दिनानाथ पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुनिता पाटील यांनी केले तर आभार कीर्ती साळी यांनी मानले. सदर कार्यक्रमासाठी शेखर पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशसस्वितेसाठी शाळेचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.