एरंडोल बस आगारातील २८५ कर्मचारी अजूनही संपावर ठाम

एरंडोल: आठवडाभरापासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संपात येथील आगारातील २८५ कर्मचारी सहभागी झाले असून अजूनही ते संपावर ठाम आहेत. शनिवारी 13 नोव्हेंबर रोजी संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी एरंडोल बस आगारात मंडप लावून बसलेल्या संपकरी कर्मचाऱ्यांना भेटून त्यांना जाहीर पाठिंबा दिला त्यात संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे मुले-मुली आई-वडील अर्धांगिनी चा समावेश होता.
एबीव्हीपी च्या तालुका पदाधिकाऱ्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दर्शवला यावेळी संपकरी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी आपले मनोगत व्यक्त केले. निलंबन झालेल्या कर्मचाऱ्यांसोबत आमचे देखील सर्वांचे निलंबन करावे असा ठराव या वेळी करण्यात आला या पुढे एरंडोल बस आगारात कुठलीही संघटना अस्तित्वात राहणार नसून पावती मुक्त व संघटना मुक्त एरंडोल आगार ठेवण्याचा निर्णय एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला. एरंडोल बस आगारात आगार व्यवस्थापक का सह अन्य दोन कर्मचारी संपकाळात कामावर आहेत असे सांगण्यात आले विशेष हे की आगारातील एकही कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई झाली नाही तसेच चोपड्या सारखा संपत कर यांचा मंडप बसा गारा बाहेर नेण्याचा प्रसंग याठिकाणी उद्भवला नाही एकंदरीत एसटी कर्मचाऱ्यांचा संप शांततेत सुरू आहे
Copy