एरंडोल नायब तहसीलदारसह दोन लिपिक कोरोना पॉझिटिव्ह

0

जळगाव: एरंडोल उपविभागीय कार्यालयातील नायब तहसीलदार व दोन लिपिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी दिली आहे.अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे कळल्यानंतर कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे मागील 8 दिवसात उपविभागीय अधिकारी, एरंडोल कार्यालयास भेट दिलेले आणि 20 मिनीटांपेक्षा अधिक वेळ कार्यालयात थांबलेल्या नागरिकांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. तसेच कार्यालयात येतान मास्क लावूनच यावे. आल्यानंतर सामाजिक अंतराचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Copy