Private Advt

एरंडोल तालुक्यातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले ; एकाविरोधात गुन्हा

एरंडोल : एरंडोल तालुक्यातील एका गावातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्यात आले. या प्रकरणी एकाविरोधात कासोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

कासोदा पोलिसात गुन्हा
एरंडोल तालुक्यातील एका गावातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. पीडीत मुलीचे वडील शेती काम करून उदरनिर्वाह करतात. मंगळवार, 19 एप्रिल रोजी रात्री कुटुंबातील सदस्य झोपले असताना संशयीत मुकेश रवींद्र कोळी या तरुणाने 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना 20 एप्रिल रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास उघडकीला आली. या प्रकरणी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तिचा परीसरात शोधाशोध केली परंतू ती कोठेही आढळून आली नाही. अखेर पीडीत मुलीच्या वडीलांनी यांनी कासोदा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर संशयीत आारोपी मुकेश कोळी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार शिवाजी पाटील करीत आहे.