एरंडोल तालुका कृषी विभागातर्फे बी बियाणे व खते खरेदीसाठी ऑनलाईनची सुविधा

0

एरंडोल: तालुक्यात बी बियाणे व खते खरेदीसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तरी शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी शरद बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी बाजारात येण्याचे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे त्यानुसार कृषी विभाग कृषी सेवा केंद्र व शेतकरी गट यांच्या समन्वयाने शेतकऱ्यांना बांधावर व गावात बियाणे व खते या निविदा पोहोचण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांनी आपल्या शेतकरी गट प्रमुख काकडे आपल्याला हवी असलेली बियाणे खते व आपल्या पसंतीच्या कृषी केंद्राचे नाव गटप्रमुख कडे द्यावे त्यानुसार तो गटप्रमुख शेतकऱ्याने नोंदवलेल्या निविदा त्याने नोंदवलेल्या पसंतीच्या दुकानातून खरेदी करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती पत्रकात देण्यात आली आहे.

कृषी विभागातर्फे एक लिंक तयार केली असून या लिंक वर देखील शेतकरी नाव नोंदवू शकतात या लिंक वर मागणी नोंदवलेल्या नंतर त्याचे विश्लेषण करून गावातील शेतकरी गट प्रमुखा मार्फत नमूद केलेल्या कृषी केंद्रावरून शेतकरी गटांना निविदा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या गावातील कृषी सहाय्यक कृषी मित्र प्रगतिशील शेतकरी यांची मदत घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

एरंडोल तालुक्यात ७४ गट असून या उपक्रमांतर्गत ६८८७ कापूस बियाणे पाकिटे ५५७ मेट्रिक टन युरिया २४२ टन डीएपी याप्रमाणे एकूण १४६० टन खतांची मागणी करण्यात आली आहे या उपक्रमाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Copy