एरंडोल गटासाठी १ तर गणांसाठी ३ अर्ज बाद

0

एरंडोल । तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या तिन गटांसाठी उमेदवारांनी १५ अर्ज दाखल केले होते तर पंचायत समितीच्या सहा गणांसाठी ४६ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आज रोजी छाननी अंती तिन गटांसाठी १५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते तर एक अर्ज बाद झाल्याने १४ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहे तर सहा गणांसाठी ४४ उमेदवारांनी ४६ अर्ज दाखल केले होते त्यापैकी तिन अर्ज बाद झाल्याने ४३ अर्ज शिल्लक राहिले आहेत. दरम्यान कासोदा जि.प.गटातील काँग्रेसच्या उमेदवार दिपाली उमेश पाटील यांचा सूचक हा दुसर्‍या गटातील असल्याने त्यांचा अर्ज बाद करण्यात आला.तर आडगाव गणातील ठाकुर केशरलाल नारायण यांनी काँग्रेस व अपक्ष असे दोन अर्ज दाखल केलेले होते या दोनही अर्जांचा सूचक एकच असल्याने त्यांचा अपक्ष अर्ज बाद करण्यात आला. अशाच प्रकारे रिंगणगाव गणातील बडगुजर गीता सुनिल यांनी राष्ट्रवादी व अपक्ष असे दोन अर्ज भरले होते व सूचक एकच होते त्यामुळे त्यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला.उत्राण गणातील नाईक अभयसिंग सोनु यांनी राष्ट्रीय समाज पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता त्यांचा सूचक हा दुसर्‍या गणातील असल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला. विखरण-रिंगणगाव गटात शिवसेना,भाजप,राष्ट्रवादी व एक राष्ट्रीय समाज पक्ष अशी चौरंगी लढत रंगणार आहे. तर तळई – उत्राण गटात शिवसेना,भाजप,राष्ट्रवादी अशि तिरंगी लढत होणार आहे. अंतिम चित्र माघारी नंतरच स्पष्ट होणार आहे.

अमळनेरात जिप व पंसचा एक-एक अर्ज बाद
अमळनेर । येथील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आज छाननीच्या दिवशी दोन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारींनी बाद केला. यात जानवे शिरुड जिल्हा परिषद गटातील शोभाबाई जगन्नाथ सोनवणे तर पातोंडा पंचायत समिती गणातील चारुदत्त चापा संदानशिव छाननीच्या वेळेस आपले जातीचे मूळ प्रमाणपत्र सादर न केल्याने या दोघांचे अर्ज बाद केले.

पाचोर्‍यात पं.स.चे ६३ अर्ज मंजुर
पाचोरा । तालुक्याच्या जि.प.व पं.स. निवडणुकीत आजच्या छाननी प्रक्रियेत एकाच अर्जावर युक्तीवाद चालला परंतु त्या अर्जासह सर्वच उमेदवारांचे अर्ज मंजूर करण्यात आले. पाचोरा पचांयत समितीच्या ६३ उमेदवारांचे अर्ज मंजुर झाले. तर जि.प.चे ३७ अर्ज मंजुर झाले. यात बाळद-नगरदेवळा गटातील शिवसेनेच्या मनोगर गिरधर पाटील यांच्या अर्जावर भाजपाचे शातांराम धनराज पाटील यांनी हरकत घेतली होती. या हरकतीवर युक्तिवादाने दोन्ही बाजु एकल्यावर निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा खत्री यांनी सदरची हरकत फेटाळत अर्ज मंजुर केला.