एरंडोल कोविंड सेंटरमधून ७ रुग्णांची घरवापसी

0

एरंडोल:येथे कोविड सेंटर मधून यशस्वी उपचार घेऊन ७ रुग्ण बरे झाले व ते रुग्ण शनिवारी दुपारी आनंदाने घरी परतले त्यात एरंडोल ०३ , फरकांडे ०२, अंतुर्ली ०२, याप्रमाणे बरे झालेले रुग्ण आहेत अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास पाटील यांनी दिली आहे.
आजच्या घटकेला एरंडोल केअर सेंटर मध्ये एकूण ६६ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यात २५ पॉझिटिव्ह रुग्ण, व ४१ संशयित रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ५४ जणांचे स्वॅब घेण्यात आले. आता एरंडोल तालुक्यातील या ५४ स्वॅब चे आव्हाल काय येणार याची प्रतीक्षा आहे.

Copy