एरंडोलात बुद्ध पौर्णिमादिनी शांती संदेश रथयात्रा

0

एरंडोल । येथील जयंती उत्सव समिती व बौद्ध समाज मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी 10 रोजी बुद्ध पौर्णिमे निमित्त शहरात शांती संदेश यात्रेचे आयोजन करण्यात आले. केवडी पुरा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस निरीक्षक बाळासाहेब केदारे अध्यक्षस्थानी होते. प्रतिमांपुजनाने व सामुहिक बुद्ध वंदनेने कार्यक्रास सुरुवात करण्यात आले. वीरएकलव्य यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. नगराध्यक्ष रमेश परदेशी यांचे हस्ते शांती संदेश यात्रेचे उदघाटन करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक एम.एस.बैसाणे, प्रा.नरेंद्र गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. शांती संदेश यात्रा शहरातील प्रमुख मार्गावरून नेण्यात आली. यावेळी रथयात्रेवर ठिकठीकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली.

शांती संदेश रथयात्रेत सहभागी झालेल्या समाज बांधवांच्या हातातील मेणबत्त्या यात्रेचे विशेष आकर्षण ठरले. प्रास्तविक व सूत्र संचालन प्रा.नरेंद्र गायकवाड यांनी केले. भारत बोरसे यांनी आभार मानले. कार्यक्रमास बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, नगरसेवक योगेश महाजन, प्रमोद महाजन,यांचेसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे अध्यक्ष प्रकाश शिंदे, अनिल बोढरे, नितीन बोरसे, सागर बोरसे, लखन बनसोडे, मनोज बोरसे, कैलास बोढरे, प्रशांत इंगळे, सुनील गायकवाड, रवींद्र बोरसे यांचेसह भीमनगर मित्र मंडळ, सम्राट मित्र मंडळ, स्वाभिमान गृप, पंचशील मित्र मंडळ, रमाबाई आंबेडकर नगरच्या पदाधिकार्‍यांनी सहकार्य केले.