एरंडोलात कापड दुकान फोडून 32 हजारांची चोरी

0

एरंडोल । येथील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलातील साई कलेक्शन या दुकानात 20 फेब्रु.च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरी करून मुद्देमालासह रोख रक्कम एकूण 32 हजार 500 चोरून नेल्याची घटना आज सकाळी उडकीस आली. दरम्यान याबाबत मिळालेली माहिती अशी कि शहरातील मध्यवर्ती भागातील असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलातील दुकानासमोरील चहावाला हा आपले दुकान उघडण्यासाठी आला असता त्याला आपल्या समोरचे साई कलेक्शन हे कापडाचे दुकान अर्धवट उघडे असल्याचे दिसुन आले.

एरंडोल पोलिसांना चोरट्यांचा ठेंगा
संबंधित कापड दुकानाचे मालकाला दुकान अर्धवट उघडे असल्याचे कळवले. दुकान मालकाने तात्काळ दुकानात येऊन बघितले असता त्यांच्या दुकनतिल 30 जीन्स प्यांट,30 शर्ट,20 टी शर्ट असा 30 हजाराचा माल व अडीच हजार रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लांबवला. याबद्दल पोलीस स्टेशनला माहिती विचारली असता सदर चोरीची खबर नसल्याची पोलिसांनी दिली. सदर व्यापारी संकुलातील हि चौथी घटना असून गेल्या वर्षी खुप मोठ्या प्रमाणात भुरट्या चोर्‍या व मोठ्या चोर्‍यांचे नाट्य शहर वाशीयांना बघावयास मिळाले आहे. शेवटपर्यंत चोरटे पोलिसांच्या हाती लागले नाही. परंतु नुकतेच शहरात आलेले पोलीस निरीक्षक बाळासाहेब केदारे यांनी तरी या चोरट्यांना पकडून जेरबंद करावे. जेणे करून एरंडोल येथील रहिवाशी भीती मुक्त राहतील अशी मागणी केली आहे.