Private Advt

एरंडोलमध्ये बंद घर चोरट्यांना पर्वणी : दोन लाखांच्या रोकडवर डल्ला

एरंडोल : शहरातील सावतामाळी नगरात बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी दोन लाख रुपयांची रोकड लांबवली. याबाबत एरंडोल पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्यांनी साधली संधी
एरंडोल पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण तुकाराम मिस्तरी (32, रा.सावतामाळी नगर) हे फर्निचरचे काम करतात. गुरुवार, 14 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास ते कामाच्या निमित्ताने घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले असता चोरट्यांनी संधी साधली. बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत कपाटातून दोन लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची बाब शनिवार, 16 एप्रिल रोजी दुपारी उघडकीला आले. याबाबत प्रवीण मिस्तरी यांनी एरंडोल पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्याने अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शरद बागल करीत आहे.