एरंडोलमध्ये कोरोनाचे अर्धशतक

0

एरंडोल:- गेल्या तीन आठवड्यांमध्ये एरंडोल तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या ५१ झाले आहे. पैकी २२ रुग्ण उपचार घेऊन बरे झाल्यामुळे त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.
आतापर्यंत तालुक्‍यात कोरोना चे दोन बळी गेले आहेत. ॲक्टिव्ह केसेस २७ आहेत. एरंडोल कोविंड केअर सेंटरमध्ये १५ रुग्णांवर उपचार होत आहे. तर जळगाव केअर सेंटर मध्ये ११ जन दाखल आहेत. तसेच १ रुग्ण नाशिक येथे उपचार घेत आहे.
रविवारी तालुक्यात नव्याने ७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले त्यात एरंडोल येथील जोरी गल्लीतील १६ वर्षीय मुलगा, ३५ वर्षीय पुरुष, व ६० वर्षीय महिला यांचा समावेश आहे
ग्रामीण भागात फरकांडे येथे ३३ वर्षीय महिला ,३६ वर्षीय महिला, नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत याशिवाय अंतुरली येथे ५६ वर्षीय महिला ,व ३० वर्षीय महिला हे दोन नवे रुग्ण घडून आले आहेत.
रविवारी एरंडोल कोविंड केअर सेंटर मधून ७ पॉझिटिव्ह रुग्णांना लक्षणे नसल्यामुळे दहाव्या दिवशी यशस्वी उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
यावेळी प्रांताधिकारी विनय गोसावी, व तालुका वैद्यकीय अधिकारी तहसीलदार अर्चना खेतमाळीस ,डॉ. फिरोज शेख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास पाटील , डॉ. रोहित वाणी, डॉ. राकेश झोपे .आदी.यांनी गुलाब पुष्प देऊन निरोप दिला.
तालुक्यातील रुग्ण संख्या पाहता निम्मे रुग्ण उपचार झाल्याने बरे झाल्याचे आढळून येत आहे ही दिलासा देणारी बाब आहे.

Copy