एरंडोलनजीक लाकडी पट्टया घेऊन जाणारा ट्राला पलटी

0

एरंडोल: लाकडाच्या पट्ट्यांची वाहतूक करणारा ट्राला उलटल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर घडली. एरंडोल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भालगाव फाट्याजवळ ही घटना घडली. यात चालक नंदलाल भाभुरजी हा जखमी झाला. ट्राला लाकडाच्या पट्ट्या भरून गुजरात राज्यातील गांधीनगर येथून नागपूरला जात होता. भालगाव फाट्याजवळ चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने ट्राला पलटी झाला.

Copy