एरंडोलच्या वीर जवानाला साश्रू नयनाने निरोप

0

एरंडोल: एरंडोल येथील शहीद जवान राहूल लहू पाटील यांच्या पार्थिवावर आज रविवारी ७ रोजी अंतिम संस्कार करण्यात आले. साश्रू नयनाने राहुल पाटीलला अखेरचा निरोप देण्यात आला. शासकीय इतमामात राहुल पाटीलवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय लोटला होता. संपूर्ण एरंडोलकर शोक सागरात डुबले होते.

यावेळी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन, आमदार चिमणराव पाटील, आमदार मंगेश चव्हाण उपस्थित होते. रात्री शहीद जवान राहुल पाटील यांचे पार्थिव घरी आणण्यात आले.

Copy