एरंडोलच्या युवकांनी नविन वर्षानिमित्त स्तुत्य उपक्रम

0

एरंडोल । नविन वर्षाचे स्वागत म्हटले तर आपल्या तरुणांमधे एकच गोष्ट असते ती म्हणजे सर्व तरुण मित्रांनी एकत्र यावे व एखाद्या हॉटेलात जाऊन धांगडधिंगा करुन खुप नाचणे, दारु पिणे आदी करणे व सरते शेवटी रात्री 12 वाजता नविन वर्षाचे स्वागत करणे बस इथपर्यंतच आजचा युवक करत आहे व करीत आला आहे. परंतू आला अपवाद ठरवत एरंडोल येथिल मानव सेवा बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष विकी खोकरे व रामभैय्या मित्र परीवार एरंडोल तर्फे 31 डिसेंबर 2016 च्या मध्यरात्री कोणतीही पार्टी व दारु बियर न पिता अंदाधुंद नशेत मौजमस्ती न करता एरंडोल शहरातील महान पुरुषांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन त्यांच्या विचारांवर चर्चा केली व अशा महान पुरुषांचे कार्यअंगी करुन त्यांनी दाखवलेल्या रस्त्यावर चालण्याचा नविन वर्षात संकल्प केला असल्याचे या युवकांनी सांगीतले.

यांची होती उपस्थिती
यावेळी शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांती ज्योती महात्मा जोतीबा फुले व जाणता राजा शिवाजी महाराज या महापुरुषांच्या पुतळ्यास माल्याअर्पण करुन मानवंदना व आर्शिवाद घेवुन नविन वर्षाचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी विक्की खोकरे, अविनाश जाधव, रितीक खोकरे, रोहीत अठवाल, नितीन खोकरे, विनोद बोयत, दुर्गश खोकरे, आबाजी बाविस्कर, मागींलाल ठाकरे आदी युवक हजर होते.