एमआयडीसी पोलिसांची माणुसकी ; विद्यार्थिनींना घरभाड्यासह संसारउपयोगी साहित्य देवुन मदतीचा हात

0

जळगाव – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदीच्या आदेश आहेत. गावी जाता येत नसल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या जळगावात राहत असलेल्या दोन विद्यार्थीनींना एमआयडीसी पोलिसांनी मदतीचा हात दिला आहे.

नंदुरबार येथुन जळगावात संगणकाच्या शिक्षणाकरिता दोन विद्यार्थिनी रामेश्वर कॉलनी परिसरात घरात भाडेतत्त्वावर वास्तव्यास आहे.

संचारबंदीचे आदेश असल्याने गावीही जाता येत नसल्याने घरभाडे देण्यासह घरात खायला अन्नधान्य नाही अशा अडचणीत दोन्ही विद्यार्थिनींसह तिचे पालक होते.

सोमवारी विद्यार्थिनींच्या पालकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे रणजीत शिरसाठ यांची भेट घेवुन त्यांना सत्य परिस्थिती कथन केली. गावी जाने करिता पास बनवून देण्याची विनंती केली . मात्र संचारबंदीचे आदेश असल्याने पोलीस निरीक्षकांनी त्यांची समजूत घातली. घर भाड्यासह खायलाही काही नसल्याने विद्यार्थिनींना अश्रु अनावर झाले. यानंतर पोलिस निरीक्षक शिरसाठ यांनी माणुसकी दाबत दोन्ही विद्यार्थिनींना घरभाड्याचे दोन हजार रुपयांसह संसारउपयोगी अन्नाधान्य तसेच इतर वस्तू देत दोन मदत केली. तसेच जळगावात राहण्याबाबत मानसिक आधार दिला. या मदतीने कुटुंब विद्यार्थिनींच्या पालकांनी पोलीस निरीक्षकांचे आभार मानले .

Copy