Private Advt

एमआयडीसीत कोरड्या गवताला आग

जळगाव : एमआयडीसी परीसरातील एका वृत्तपत्राच्या कार्यालयामागील मोकळ्या जागेवरील कोरड्या गवताला गुरूवार, 24 मार्च रोजी दुपारी 12 वाजता अचानक आग लागली. महापालिकेच्या अग्निशमन बंबाद्वारे ही आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे.

कोरड्या गवताला अचानक लागली आग
एमआयडीसी परीसरातील एका वृत्तपत्राच्या कार्यालयामागील मोकळ्या जागेतील पटांगणात असलेल्या कोरड्या गवताला गुरूवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. आग लागल्याची माहिती जळगाव महापलिकेच्या अग्निशमन विभागाला समजल्यानंतर एक अग्निशमन बंब तातडीने रवाना झाला. बंब घटनास्थळी पोहचल्यानंतर काही मिनीटाच्या आत आग विझविण्यात पथकाला यश आले. या आगीत काहीही आर्थीक नुकसान झालेले नाही परंतू या पटांगणातील कोरडे गावतासह झाडेझुडपे जळून खाक झाली. आग विझवण्यासाठी चालक वसंत न्हावी, भगवान पाटील, रविंद्र बोरसे, पुंडलिक सोनवणे आणि नितीन बारी यांनी प्रयत्न केले.