Private Advt

एमआयडीसीतील पॉलिमर्स कंपनीतील साहित्य लंपास

 

जळगाव । एमआयडीसीतील एम. सेक्टरमधील ओम पॉलिमर्स कंपनीच्या कार्यालयातील सीसीटीव्हीडीव्हीआर व काही इलेक्ट्रॉनिक वस्तूंची चोरी झाली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ओम पॉलिमर्स कंपनीचे कार्यालय 24 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 5 मे दरम्यान बंद होते. चोरट्यांनी कार्यालयाच्या खिडकीची जाळी तोडून आत प्रवेश केला. कार्यालयामधील कॉम्प्यूटर, सीसीटीव्ही डीव्हीआर, माॅनिटर, किबोर्ड, माऊस असा एकूण 63 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. याबाबत कंपनीचे लोकेश आनंदराव मराठे (वय 22, रा. मेहरुण यांनी फिर्याद दिली. त्यावरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी करीत आहेत.