एनसीसी कॅडेटस्तर्फे महाबळ परिसरात स्वच्छता अभियान

0

जळगाव । शहरातील महाबळ परिसर येथे 18 महाराष्ट्र बटालियन एन. सी. सी. तर्फे 7 रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आला. या अभियानात 120 कॅडेटस् ने सहभाग घेतला होता. याप्रसंगी महानगरपालिकेचे महापौर नितिन लढ्ढा, युवाशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष विराज कावडीया, कमांडींग अ‍ॅाफिसर दिलीप पांडे, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील, कर्नल के. अ‍ॅलेक्स जोसफ, मेजर डा.ॅ के. एन. पाटील, कॅप्टन नंदा बेंडाळे, लेफ्टनंट डॉ. बी. एन. केसुर, लेफ्टनंट गौतम भालेराव, थर्ड ऑफिसर बी.ए. पानपाटील आदी उपस्थित होते

जनजागृतीपर पत्रक वाटप

या अभियाना दरम्यान कॅडेटस्ने परिसरातील गटारी-नाल्यांची सफाई करण्यात आली. तर रस्त्यालगत असलेला कचरा उचलण्यात आला. नागरिकांना जनजागृतीपर पत्रक वाटण्यात आले. यासह हॉकर्स बांधवांना प्लास्टीकच्या पिशव्या न वापरता कागादाच्या पिशव्या वापरण्याचे आवाहन देखील विद्यार्थ्यांकडून करण्यात आले.