‘एनटीआर बायोपिक’, पोस्टर रिलीज

0

मुंबई: आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एनटीआर यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट येणार आहे. या चित्रपटात विद्या बालनही बघायला मिळणार आहे. ती एनटीआर यांच्या पत्नीची भूमिका निभावताना दिसणार आहे.

 

राणा दग्गुबती आणि सुमंथ यांची या चित्रपटात महत्वाची भूमिका आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी एनटीआर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखदेखील त्यांनी सांगितली. या चित्रपटाचे दिग्दर्शन बालाकृष्णा, विष्णू वर्धन आणि साई कोरापटी करणार असून निर्माते क्रिश आहेत. हा चित्रपट ९ जानेवारी २०१९ ला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.