‘एनटीआर बायोपिक’चं पहिलं गाणं प्रदर्शित!

0

मुंबई : सध्या बॉलीवूडमध्ये बायोपिकचा ट्रेंड सुरु आहे. अश्यातच एक नवीन बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एनटीआर यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट कलावकारच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे पहिले गाणे ‘कथा नायका’ हे प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे.

प्रसिद्ध गायक कैलाश खेरने हे गाणे गायले आहे. तसेच शिवाशक्ती दत्ता आणि डॉ. के रामकृष्ण यांनी या गाण्याचे बोल लिहिले असून एम. एम. किरावानी यांनी संगीतबद्ध केले आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन बालाकृष्णा, विष्णू वर्धन आणि साई कोरापटी करणार असून निर्माते क्रिश आहेत. हा चित्रपट तेलुगू, तमिळ आणि हिंदी भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. राणा दग्गुबती आणि सुमंथ यांची या चित्रपटात महत्वाची भूमिका आहे. या चित्रपटात विद्या बालन एनटीआर यांच्या पत्नीची भूमिका निभावताना दिसणार आहे.