एनएसडीच्या अध्यक्षपदी परेश रावल

0

नवी दिल्ली: ज्येष्ठ अभिनेता माजी खासदार परेश रावल यांची नॅशनल स्कुल ऑफ ड्रामाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एनएसडीच्या अध्यक्षपदी परेश रावल यांची नियुक्ती केली. सध्या या पदावर राजस्थानी कवि अर्जुन चरण हे कार्यरत आहेत. लवकरच परेश रावल पदभार स्वीकारणार आहेत. चरण यांची 2018 मध्ये अध्यक्षपदी निवड झाली होती.

परेश रावल हे भाजपाचे नेते आहेत, ते खासदार देखील राहिलेले आहेत. कलावंत म्हणून परेश रावल यांची मोठी कामगिरी आहे. त्यांनी अनेक चित्रपटात खलनायकाची तसेच विनोदी भूमिका निभाली आहे.

नॅशनल स्कुल ऑफ ड्रामाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुनही यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. एनएसडी परिवारात या लिजंड कलाकाराचे स्वागत आहे. एनएसडीला एका विशिष्ठ उंचीवर नेण्याचं काम ते आपल्या अनुभवातून करतील, असेही या ट्विटर हँडलवर म्हटले आहे.

Copy