एटीएममधून बनावट नोटा

0

नवी दिल्ली : दिल्लीतल्या संगम विहार येथून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून चक्क लहान मुलांच्या खेळण्यातील नकली नोटा बाहेर आल्या आहेत. एटीएममधून निघालेल्या या 2 हजारांच्या बनावट नोटावर चिल्ड्रेन बँक ऑफ इंडिया असे छापलेले दिसत आहे. अशा नोटा लहान मुले व्यापार खेळण्यासाठी वापरत असल्याचीही माहिती मिळाली आहे. संगम विहार येथे एका तरुणाने एटीएममधून पैसे काढले असता त्याला या नोटा प्राप्त झाल्या आहेत. या तरुणाने तत्काळ पोलीस स्टेशनला जाऊन त्याची तक्रार केली. त्यानंतर पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांनी एटीएम मशीन सील केले आहे. या तरुणाने पोलिसांना एटीएममधून पैसे काढण्याची स्लिपही दाखवली आहे. दक्षिण दिल्लीतल्या खासगी कंपनीत कार्यरत असलेल्या रोहित कुमारने एटीएममधून हे पैसे काढल्यानंतर त्याला चिल्ड्रेन बँक ऑफ इंडिया छापलेल्या नोटा प्राप्त झाल्या. त्या नोटांवर लेबलही पाहायला मिळते आहे.