एक हजाराची नवी नोट लवकरच

0

नवी दिल्ली : नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर जुन्या पाचशे, हजारच्या नोटा चलनातून बाद झाल्या. त्यानंतर पाचशे आणि दोन हजार रूपयांच्या नव्या नोटांची युध्दपातळीवर छपाई करून त्या चलनात आणल्या गेल्या आहेत. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून लवकरच एक हजार रुपयांच्या नव्या स्वरूपातील नोटा आणल्या जाणार आहेत, अशी माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या उच्चपदस्थ अधिकार्‍याने दली आहे.

नवी नोट कधी येणार?

27 जानेवारीपर्यंत नव्या पाचशे आणि हजार रुपयाच्या नोटांच्या स्वरुपात 9.92 लाख कोटी रुपये चलनात आले आहेत,’ अशी माहिती रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर आर. गांधी यांनी 8 फेब्रुवारीला दिली होती. नोटाबंदीच्या निर्णयानंतर पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद झाल्या. यानंतर पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा रिझर्व्ह बँकेकडून चलनात आणण्यात आल्या. नोटाबंदीच्या निर्णयामुळे पाचशे आणि हजार रुपयांच्या 15.44 लाख कोटी रुपये चलनातून बाद झाले. नव्या स्वरूपातील हजार रुपयांच्या नोटांची छपाई रिझर्व्ह बँकेने सुरू केली असली तरी नवी नोट नेमकी केव्हा चलनात येईल, हे अद्याप निश्चित झालेले नाही.

छपाईला सुरवात

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक हजार रुपयाच्या नव्या नोटांच्या छपाईला सुरुवात केली आहे. एक हजार रुपयाच्या नव्या नोटा जानेवारीतच चलनात आणल्या जाणार होत्या. मात्र तेव्हा पाचशे रुपयांच्या नोटांच्या छपाईचे काम सुरु असल्याने हजार रुपयांच्या नोटांची छपाई होऊ शकली नव्हती,’ अशी माहिती रिझर्व्ह बँकेच्या अधिकार्‍याने दिली.